शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

पोशिंदा

पोशिंदा


डोळ्यातली असाव गळत होती
पुसणार कोणी नव्हत ...
थकला हा पोशिंदा
त्याला उठवणार कोणी नव्हत ....
हाक देऊन पण न ऐकणार
हे सरकार झोपलं होत ...
भरलेल्या तळ्याकाठी बसून
तहानेने व्याकूळ होत ...
अरे जगलाच नाही तो स्वतासाठी ...
कधी लेकासाठी तर,
कधी घासभर पोटासाठी ...
गरज नाही त्याला रे
तो साधेपणात रंगत असतो
फाटलेला सदरा अंगात असला तरी
तो खुशीत दिवाळी साजरी करीत असतो ....


शनिवार, ४ मार्च, २०१७

शब्द मी तुझ्या मनातले …

आताच जाणवले  मला असे
नाही जपले शब्द मी तुझ्या मनातले
का नाही दिसले मला
ते पाणी पाझरताना त्या  डोळ्यातले
फक्त वेड्यागत पाहत होतो
का न कळले दुख तुझ्या मनातले
मला न जाणवू देता तू जपले
ते दुख त्या आठवणी आणि पाणी त्या डोळ्यातले
पाहत होतो चेहऱ्याकडे आनंदाने
 त्या मागील आठवणी ,ते रडणे ,ते बोलणे ,तुझ्या हृदयातले
ओवी तुझी आठवण अशी स्पर्शून जाते
आणि उमटतात अक्षरे त्या आपल्या आठवणीतले
न समजले मला न समजले तुला
पण तुझे शब्द नाही जपले मी माझ्या मनातले
एखादे पान जरी मिळाले कोरे कधी
शब्द आपोआप  उमटतात,काही प्रेमाचे तर काही आठवणीतले
मी जपेल माझ्या तुला दिलेल्या शब्दाला
काही असतील मनातल्या कोपऱ्यात,तर काही हृदयातले

शुक्रवार, ३ मार्च, २०१७

मानव जन्म कधी

आई तुझ्या कुशीत ,पुन्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासून ,दूर जावेसे वाटते ....१
कोणी न येथे कोणाचा सारीच नाती खोटी
तुझ्याशीच फक्त आता ,नाते जपासेवे वाटते ...२
उकळून प्यायलो मी सुख दुख सारे
मातेतुझ्या विरहास ,न प्यावेसे वाटते...३  
कितेक रात्री ऐश्वर्यात लोळलो मी
अखेरच्या क्षणाला ,तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ... ४.
दगडातला तो देवही ,आता नवसाविना पावेना
निस्वार्थ हृदय माउली ,तुलाच पूजावेसे वाटते ...  ५
असेल जर मजला ,मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी ,पुन्हा जन्मावेसे वाटते....६


सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

आता तरी वाट चुकू नका करुनी त्याचा अपमान ...


सलाम करा त्याला
ज्याचा पूर्ण जगात आहे सन्मान
आता तरी वाट चुकू नका
करुनी त्याचा अपमान ...
गोष्ट आहे त्या झेंड्याची
जाणे बाळगली आपली शान
आता तरी वाट चुकू नका
करुनी त्याचा अपमान ...
आहे पहिला रंग केशरी
जगू स्वप्न सारे सोनेरी
शेवटी रंग हिरवा
नको जातीचा हा असा दुरावा
पांढऱ्या रंगाची गोष्ट खूप छान
आता तरी वाट चुकू नका
करुनी त्याचा अपमान ...
घेऊ हातात हात खरच हृदयातून आत
नाही करणार त्याचा अपमान ,नाही चुकणार वाट ....

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी .....








मी कुठे म्हणालो परी मिळावी
फक्त जरा बरी मिळावी .....

प्रयत्न मनापासून आहेत मग
किमान एक तरी मिळावी
स्वप्नात तश्या खूप भेटतात
कधीतरी खरी मिळावी ......१.

हवीहवीशी एक जखम
एकदातरी उरी मिळावी
गालावर खळी नको तिच्या
फक्त जरा हसरी मिळावी .....२ .

चंद्रासारखी सुंदर नकोच
फक्त जरा लाजरी मिळावी ...३.

मी कुठे म्हणालो परी मिळावी
फक्त जरा बरी मिळावी .....

Form :-->
आकाश बायस 

रविवार, २९ जानेवारी, २०१७

सांगायचेच राहिले ...

     सांगायचेच राहिले ...

जेंव्हा पहिल्यांदा मी तिला पाहिलेसारं काहि थांबल्या सारखे जाणवले,
खुप वाटले तिला जाऊन बोलावं पण तीच्या नकाराच्या भितीने माञ तिला बोलायचेच राहिले.जेंव्हा मी तिला पहिल्यांदा भेटलो माझे मन फक्त तिचाच विचार करत बसले,
तीच्या विचारात वेळेचं भान नाहि राहिले, नी मी तुला like करतो हे तिला सांगायचेच राहिले.
आमच्या मैत्रीचे नाते खुप जवळ आले,
जगभराच्या गोष्टि करण्यामध्ये स्वतःच्या मनातले मात्र तिला सांगायचेच राहिले.
नकळत तिच्या आयुष्या मध्ये कोनीतरी आले, तिला माझ्या पासून दूर घेऊन गेले,
हे सर्व संपण्या अगोदर तिला १दा पहावेसे वाटले पण शेवटचे तिला पहायचेच राहिले,
मी तिच्यावर किती प्रेम करतो हे तिला सांगायचेच राहिले...                                     - उद्धव  मिसे 


गुरुवार, २६ जानेवारी, २०१७

फक्त स्पंदने होती ...


फक्त स्पंदने होती ...
मनाच्या गाभाऱ्याला जाग आली
अंधारी रात्र होती तसी पाहत झाली ..
हळूच फुले गालात हसली
तसी मला एक चांदणी नभात दिसली ....

काहूर मनी दाटला होता
विचार मनात बराच येत होता ..
बोलणार आज सारे
असा ठाम निश्चय होता ....

स्पंदने स्फुरली सारी
विचाराचे वादळ घेऊन होती ..
एकी पेक्षा एक अशी ती
ती समोरून जात होती ....

आला आनंदाचा वारा जसा
कसा पसरला मोराचा पिसारा
आज पुन्हा एकदा भरला होता
सारा आनंदाने समुद्र किनारा ...

मी त्याला सांगणार होतो
आज स्वप्ने मी जगली होती ..
तो पुन्हा –पुन्हा सांगत होता

वेड्या ती तर तुझी फक्त स्पंदने होती ,फक्त स्पंदने होती ...

मंगळवार, १० जानेवारी, २०१७

मन माझ .....?


मन माझ .....?
माझ मन तुझ झाल अस वाटायचं 
तुला पाहताना मला वेगळंच सांगायचं .......
डोळ्यातलं पाणी नकळत आटायचं
काहीतरी नजरेला सांगायचं
पण भीतीने दुरायचं.......

मन माझ किती वेळा तुला भेटायचं
तुला न भेटताच परतायचं
अस होऊन हि काय हे तुला
काहीच नाही वाटायचं .........

बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

आसुसलेल्या डोळ्यांनी वाट पाहत होतो

 
आसुसलेल्या डोळ्यांनी वाट पाहत होतो
आसुसलेल्या डोळ्यांनी वाट पाहत होतो
ओठात नाही गाणे तरी गात होतो
सारे जग सोडून आलो तरी
ती काही आलीच नाही .......१

पापण्यातील पाणी आटले
बोलण्यास हे कंठ दाटले
बेधुंद असा मी झालो तरी
ती काही आलीच नाही.....२



मागे पुढे वळून पाहत होतो
चूकली का वाट वळून पाहत होतो
वाटेत घामाघूम मी झालो तरी
ती काही आलीच नाही .....३

संयमाचा बांध तुटला
कंठाचा बांध सुटला
शून्यापरी होऊन उरलो तरी
ती काही आलीच नाही .....४

डोळ्यात सारे सागर दाटले
आभाळीचे नभ फाटले
वेगाने जमिनीवर बरसले
आकांत झाला एक सुरात
वेगाने सर्वत्र पसरले तरी
ती काही आलीच नाही .....५



गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

मिली जिंदगी तेरे आने से

मिली जिंदगी तेरे आने से
सबकुच मिला तुझे पाने से 
साथ रहे तेरा यही मांगा हे  रब से ...१
नही शिकायत तेरे नजरोसे
या नही तेरे ओठोसे
बस याद रखना तू मुझे
मैने मांगा तेरा साथ हे रब से  ...२
ना जाना मेरे आखोसे दूर
ना करणा मुझे तू मझ बुर
बस तू याद रखना मुझे
साथ रहे तेरा यही मांगा हे रब  से  ...३




तू फक्त एकदा माग फिरून बघ ....!!!

मागत नाही जग सार काही
फक्त माग फिरून बघ
बोलण्यासाठी तरसतो आहे
फक्त एकदा बोलून बघ....१
नकार दिला तरी चालेल
वाईट बोललीस तरी जमेल
फक्त ते दोन शब्द बोलून बघ
तू फक्त एकदा मागे फिरून बघ ...२
डोळ्यात पाणी येई पर्यंत
घश्यात कोरड येई पर्यंत
तू समोर असे पर्यंत
फक्त नजरेत नजर आणून बघ
तू फक्त एकदा मागे फिरून बघ ....३
सारे रंग फिके झाले
भरलेले रिकामे झाले
माझ्या हृदयात एकदा राहून बघ
तू फक्त एकदा मागे फिरून बघ ....४
वेडे झाले जग माझे
आवडले मला नाते तुझे
माझ्या हातात हात देऊन बघ
तू फक्त एकदा मागे फिरून बघ ....५  
मनात नाही दुसर काही
सोबत राहा दिवस तरी काही
जगण्याची आस देऊन तर बघ

तू फक्त एकदा मागे फिरून तर बघ ....६ 

पण ती त्याची होण्याची ती वेळच नव्हती ..


सकाळ नव नात घेऊन आली होती
बाग सजली,नटली  होती
फुले सुगंधाने  बहरली  होती
पण ती त्याची होण्याची ती वेळच नव्हती ....१ .

जग रिकाम वाटायचं
जेव्हा ती  नाही दिसायची
सतत काहीतरी ऐकावे वाटायच
 जेव्हा ती  बोलायची
पण ती त्याला काही बोलण्याची ती वेळच नव्हती .....2    

ती  बोलण्यासाठी पुढे येत होती
मन आपल घठ करीत होती
तो पण हे ऐकणार आहे
पण ती ते बोलण्यासाठी तयार  नव्हती ......3

मनात बेभान वारा वाहत होता
काठावर लाटा आदळत होत्या
मनाची अदलाबदली होत होती
वाटल शक्य आहे आता सगळ
पण ती त्याची   होण्याची ती वेळच नव्हती .....4

हृदयाची धडधड वाढत जात होती
जीव कासाविश होत होता
जग कस सुन्न वाटत होत
मन माझ तिच्यात होत
पण ती त्याची होण्याची ती वेळच नव्हती .....5

जिच्यासाठी  त्याने खूप दिवस पाहिले
तिनेच त्याला   नकार दिला
हे अस घडणार होत ,होणार होत कारण ....

 ती त्याची होण्याची ती वेळच नव्हती .....

उत्तम ठाकूर 

काही नाती पुन्हा एकदा नव्याने सोबत जगत होती

आज पुन्हा तो पाऊस आला होता
तो तिला पुन्हा तिथ भेटला होता
ती  सकाळच वेगळी  होती
तो तिला आणि ती त्याला पाहत होती ....१
पाहण्यात रंग भरत होता
पाऊसपण जोरात येत  होता         
सुकलेली फुले पुन्हा एकदा फुलली होती
तो तिला आणि ती त्याला पाहत होती .....२  
जुन्या गोष्टी रंगणार होत्या
पुन्हा गप्पा जमणार होत्या
नकळत प्रेमकळी उमलणार होती
तो तिला आणि ती त्याला पाहत होती .....३
तिच्या हसण्यात माझ जग फुलत होत 
तिच्या रडण्यात  माझ फुल सुकत होत
पुन्हा एकदा ती हसणार होती
तो तिला आणि ती त्याला पाहत होती ....४
साथ मागत होते सातजन्माचे
न रुसण्याचे सोबत जगण्याचे
पुन्हा एकदा ती सकाळ उजाडली होती
तो तिला आणि ती त्याला पाहत होती ....५
एकमेकांच्या हातात हात  होती
नजरा नजरेत एकमेकांत होती
सारी नगरी हे पाहत होती कि

तुटलेली काही नाती पुन्हा एकदा नव्याने सोबत जगत होती .....६  

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

यालाच प्रेम म्हणायचं असत.


यालाच प्रेम म्हणायचं असत.



उगाचच्या रुसव्यांना
तू मला मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असत.

एकमेका आठवायला
आणि आठवणी जपण्याला
प्रेम म्हणायचं असत.

थोडस झुरण्याला
स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.

भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला
प्रेम म्हणायचं असत.

कितीही रागावल तरी
एकमेका सावरायला
प्रेम म्हणायचं असत.

शब्दातून बरसायला
स्पर्शाने धुंद होण्याला
प्रेम म्हणायचं असत.

तुझ माझ अस न राहता
‘आपल’ म्हणून जगायला
प्रेम म्हणायचं असत.
सौजन्य :Online Source

आयुष्य खूप सुंदर आहे,♥



आयुष्य खूप सुंदर आहे,♥
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,♥
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,♥♥…
… वेगळ अस काही,
माझ्यात खास नाही अस
ंम्हणून उदास होऊ नका♥
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,♥
माझ्याकडे काय आहे,
असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य♥
तुमच्यातही लपला आहे.
आवाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो♥♥
तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणतो………
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा..

सौजन्य :online source

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...