बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

आसुसलेल्या डोळ्यांनी वाट पाहत होतो

 
आसुसलेल्या डोळ्यांनी वाट पाहत होतो
आसुसलेल्या डोळ्यांनी वाट पाहत होतो
ओठात नाही गाणे तरी गात होतो
सारे जग सोडून आलो तरी
ती काही आलीच नाही .......१

पापण्यातील पाणी आटले
बोलण्यास हे कंठ दाटले
बेधुंद असा मी झालो तरी
ती काही आलीच नाही.....२



मागे पुढे वळून पाहत होतो
चूकली का वाट वळून पाहत होतो
वाटेत घामाघूम मी झालो तरी
ती काही आलीच नाही .....३

संयमाचा बांध तुटला
कंठाचा बांध सुटला
शून्यापरी होऊन उरलो तरी
ती काही आलीच नाही .....४

डोळ्यात सारे सागर दाटले
आभाळीचे नभ फाटले
वेगाने जमिनीवर बरसले
आकांत झाला एक सुरात
वेगाने सर्वत्र पसरले तरी
ती काही आलीच नाही .....५



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...