शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

पोशिंदा

पोशिंदा


डोळ्यातली असाव गळत होती
पुसणार कोणी नव्हत ...
थकला हा पोशिंदा
त्याला उठवणार कोणी नव्हत ....
हाक देऊन पण न ऐकणार
हे सरकार झोपलं होत ...
भरलेल्या तळ्याकाठी बसून
तहानेने व्याकूळ होत ...
अरे जगलाच नाही तो स्वतासाठी ...
कधी लेकासाठी तर,
कधी घासभर पोटासाठी ...
गरज नाही त्याला रे
तो साधेपणात रंगत असतो
फाटलेला सदरा अंगात असला तरी
तो खुशीत दिवाळी साजरी करीत असतो ....


शनिवार, ४ मार्च, २०१७

शब्द मी तुझ्या मनातले …

आताच जाणवले  मला असे
नाही जपले शब्द मी तुझ्या मनातले
का नाही दिसले मला
ते पाणी पाझरताना त्या  डोळ्यातले
फक्त वेड्यागत पाहत होतो
का न कळले दुख तुझ्या मनातले
मला न जाणवू देता तू जपले
ते दुख त्या आठवणी आणि पाणी त्या डोळ्यातले
पाहत होतो चेहऱ्याकडे आनंदाने
 त्या मागील आठवणी ,ते रडणे ,ते बोलणे ,तुझ्या हृदयातले
ओवी तुझी आठवण अशी स्पर्शून जाते
आणि उमटतात अक्षरे त्या आपल्या आठवणीतले
न समजले मला न समजले तुला
पण तुझे शब्द नाही जपले मी माझ्या मनातले
एखादे पान जरी मिळाले कोरे कधी
शब्द आपोआप  उमटतात,काही प्रेमाचे तर काही आठवणीतले
मी जपेल माझ्या तुला दिलेल्या शब्दाला
काही असतील मनातल्या कोपऱ्यात,तर काही हृदयातले

शुक्रवार, ३ मार्च, २०१७

मानव जन्म कधी

आई तुझ्या कुशीत ,पुन्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासून ,दूर जावेसे वाटते ....१
कोणी न येथे कोणाचा सारीच नाती खोटी
तुझ्याशीच फक्त आता ,नाते जपासेवे वाटते ...२
उकळून प्यायलो मी सुख दुख सारे
मातेतुझ्या विरहास ,न प्यावेसे वाटते...३  
कितेक रात्री ऐश्वर्यात लोळलो मी
अखेरच्या क्षणाला ,तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ... ४.
दगडातला तो देवही ,आता नवसाविना पावेना
निस्वार्थ हृदय माउली ,तुलाच पूजावेसे वाटते ...  ५
असेल जर मजला ,मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी ,पुन्हा जन्मावेसे वाटते....६


सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

आता तरी वाट चुकू नका करुनी त्याचा अपमान ...


सलाम करा त्याला
ज्याचा पूर्ण जगात आहे सन्मान
आता तरी वाट चुकू नका
करुनी त्याचा अपमान ...
गोष्ट आहे त्या झेंड्याची
जाणे बाळगली आपली शान
आता तरी वाट चुकू नका
करुनी त्याचा अपमान ...
आहे पहिला रंग केशरी
जगू स्वप्न सारे सोनेरी
शेवटी रंग हिरवा
नको जातीचा हा असा दुरावा
पांढऱ्या रंगाची गोष्ट खूप छान
आता तरी वाट चुकू नका
करुनी त्याचा अपमान ...
घेऊ हातात हात खरच हृदयातून आत
नाही करणार त्याचा अपमान ,नाही चुकणार वाट ....

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी .....
मी कुठे म्हणालो परी मिळावी
फक्त जरा बरी मिळावी .....

प्रयत्न मनापासून आहेत मग
किमान एक तरी मिळावी
स्वप्नात तश्या खूप भेटतात
कधीतरी खरी मिळावी ......१.

हवीहवीशी एक जखम
एकदातरी उरी मिळावी
गालावर खळी नको तिच्या
फक्त जरा हसरी मिळावी .....२ .

चंद्रासारखी सुंदर नकोच
फक्त जरा लाजरी मिळावी ...३.

मी कुठे म्हणालो परी मिळावी
फक्त जरा बरी मिळावी .....

Form :-->
आकाश बायस 

रविवार, २९ जानेवारी, २०१७

सांगायचेच राहिले ...

     सांगायचेच राहिले ...

जेंव्हा पहिल्यांदा मी तिला पाहिलेसारं काहि थांबल्या सारखे जाणवले,
खुप वाटले तिला जाऊन बोलावं पण तीच्या नकाराच्या भितीने माञ तिला बोलायचेच राहिले.जेंव्हा मी तिला पहिल्यांदा भेटलो माझे मन फक्त तिचाच विचार करत बसले,
तीच्या विचारात वेळेचं भान नाहि राहिले, नी मी तुला like करतो हे तिला सांगायचेच राहिले.
आमच्या मैत्रीचे नाते खुप जवळ आले,
जगभराच्या गोष्टि करण्यामध्ये स्वतःच्या मनातले मात्र तिला सांगायचेच राहिले.
नकळत तिच्या आयुष्या मध्ये कोनीतरी आले, तिला माझ्या पासून दूर घेऊन गेले,
हे सर्व संपण्या अगोदर तिला १दा पहावेसे वाटले पण शेवटचे तिला पहायचेच राहिले,
मी तिच्यावर किती प्रेम करतो हे तिला सांगायचेच राहिले...                                     - उद्धव  मिसे 


गुरुवार, २६ जानेवारी, २०१७

फक्त स्पंदने होती ...


फक्त स्पंदने होती ...
मनाच्या गाभाऱ्याला जाग आली
अंधारी रात्र होती तसी पाहत झाली ..
हळूच फुले गालात हसली
तसी मला एक चांदणी नभात दिसली ....

काहूर मनी दाटला होता
विचार मनात बराच येत होता ..
बोलणार आज सारे
असा ठाम निश्चय होता ....

स्पंदने स्फुरली सारी
विचाराचे वादळ घेऊन होती ..
एकी पेक्षा एक अशी ती
ती समोरून जात होती ....

आला आनंदाचा वारा जसा
कसा पसरला मोराचा पिसारा
आज पुन्हा एकदा भरला होता
सारा आनंदाने समुद्र किनारा ...

मी त्याला सांगणार होतो
आज स्वप्ने मी जगली होती ..
तो पुन्हा –पुन्हा सांगत होता

वेड्या ती तर तुझी फक्त स्पंदने होती ,फक्त स्पंदने होती ...

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...