नाही जपले शब्द मी तुझ्या मनातले …
का नाही दिसले मला
ते पाणी पाझरताना त्या डोळ्यातले …
फक्त वेड्यागत पाहत होतो
का न कळले दुख तुझ्या मनातले …
मला न जाणवू देता तू जपले
ते दुख त्या आठवणी आणि पाणी त्या डोळ्यातले …
पाहत होतो चेहऱ्याकडे आनंदाने
त्या मागील आठवणी
,ते रडणे ,ते बोलणे ,तुझ्या हृदयातले…
ओवी तुझी आठवण अशी स्पर्शून जाते
आणि उमटतात अक्षरे त्या आपल्या आठवणीतले …
न समजले मला न समजले तुला
पण तुझे शब्द नाही जपले मी माझ्या मनातले …
एखादे पान जरी मिळाले कोरे कधी
शब्द आपोआप
उमटतात,काही प्रेमाचे तर काही आठवणीतले …
मी जपेल माझ्या तुला दिलेल्या शब्दाला
काही असतील मनातल्या कोपऱ्यात,तर काही हृदयातले…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा