गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

पण ती त्याची होण्याची ती वेळच नव्हती ..


सकाळ नव नात घेऊन आली होती
बाग सजली,नटली  होती
फुले सुगंधाने  बहरली  होती
पण ती त्याची होण्याची ती वेळच नव्हती ....१ .

जग रिकाम वाटायचं
जेव्हा ती  नाही दिसायची
सतत काहीतरी ऐकावे वाटायच
 जेव्हा ती  बोलायची
पण ती त्याला काही बोलण्याची ती वेळच नव्हती .....2    

ती  बोलण्यासाठी पुढे येत होती
मन आपल घठ करीत होती
तो पण हे ऐकणार आहे
पण ती ते बोलण्यासाठी तयार  नव्हती ......3

मनात बेभान वारा वाहत होता
काठावर लाटा आदळत होत्या
मनाची अदलाबदली होत होती
वाटल शक्य आहे आता सगळ
पण ती त्याची   होण्याची ती वेळच नव्हती .....4

हृदयाची धडधड वाढत जात होती
जीव कासाविश होत होता
जग कस सुन्न वाटत होत
मन माझ तिच्यात होत
पण ती त्याची होण्याची ती वेळच नव्हती .....5

जिच्यासाठी  त्याने खूप दिवस पाहिले
तिनेच त्याला   नकार दिला
हे अस घडणार होत ,होणार होत कारण ....

 ती त्याची होण्याची ती वेळच नव्हती .....

उत्तम ठाकूर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...