गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

काही नाती पुन्हा एकदा नव्याने सोबत जगत होती

आज पुन्हा तो पाऊस आला होता
तो तिला पुन्हा तिथ भेटला होता
ती  सकाळच वेगळी  होती
तो तिला आणि ती त्याला पाहत होती ....१
पाहण्यात रंग भरत होता
पाऊसपण जोरात येत  होता         
सुकलेली फुले पुन्हा एकदा फुलली होती
तो तिला आणि ती त्याला पाहत होती .....२  
जुन्या गोष्टी रंगणार होत्या
पुन्हा गप्पा जमणार होत्या
नकळत प्रेमकळी उमलणार होती
तो तिला आणि ती त्याला पाहत होती .....३
तिच्या हसण्यात माझ जग फुलत होत 
तिच्या रडण्यात  माझ फुल सुकत होत
पुन्हा एकदा ती हसणार होती
तो तिला आणि ती त्याला पाहत होती ....४
साथ मागत होते सातजन्माचे
न रुसण्याचे सोबत जगण्याचे
पुन्हा एकदा ती सकाळ उजाडली होती
तो तिला आणि ती त्याला पाहत होती ....५
एकमेकांच्या हातात हात  होती
नजरा नजरेत एकमेकांत होती
सारी नगरी हे पाहत होती कि

तुटलेली काही नाती पुन्हा एकदा नव्याने सोबत जगत होती .....६  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...