रविवार, २६ जून, २०१६

स्वप्न विसरता मात्र येत नाही



विसरावं म्हटल तरी
विसरता येत नाही
दिवस येतात,जातात
पण मन कुठेच लागत नाही

आठवणीच्या गोड आठवणी
रंगवता मात्र येत नाही
या वाटेवरून त्या वाटेवर
पण मन मात्र कुठेच लागत नाही

पाखरान पिसं पसरली
उडता मात्र येत नाही
या फांदीवरून त्या फांदीवर
पण मन मात्र कुठेच लागत नाही

पाऊस पडून गेला तरी
आठवणीच आभाळ मोकळे होत नाही
असं कधीच झाल नाही
आठवायला विसरावं लागत ,विसरता मात्र येत नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...