रविवार, २६ जून, २०१६

कोरड्या स्वप्नावर ओली फुंकर




कुठून कशा आल्या
पावसाच्या सरी
होता स्वप्नाची आठवण
कशा कोसळल्या तरी

स्वप्नाच्या जागेवर
आता ओली फुंकर
काय मनात देवाच्या
म्हणे सांगतो नंतर

ओल्याच जखमांना
मी सावरू कसा
विस्कटला डाव सारा
मी सावरू  कसा

उगाच मन माझ
एका कोपऱ्यात रडतंय
जाग आली तरी मला
एक स्वप्न मात्र पडतंय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...