शेवटची हि भेट आपली
हसून निरोप देत आहे
वरून शांत असलो तरी
आतून मात्र रडत आहे
मन माझे मलाच
काही तरी सांगत आहे
धूसर अंतरावर असतानाही
कुठेतरी वाट पाहत आहे
वाट पाली चुकली
पुन्हा भेट शक्य नाही
एक मार्ग असला तरी
प्रवास मात्र शक्य नाही
किनारा गाठण्याचे
मार्ग माहित नव्हते
जग जिंकण्याचे मात्र
स्वप्न मात्र होते
आठवणीला मी कधी
पुन्हा विसरणार नाही
जगताना मी साथ देईल
हाथ सोडणार नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा