स्वप्नाच्या आठवणीतून
समोर कोणीच येत नाही
ओलसर डोळ्यातून त्या
पाणी कधीच येत नाही
कोरड पडली घश्याला
तरी ते ओरडत नाही
उकलले डाव सारे तरी
गुंता मात्र उकळत नाही
माझ्या या वेड्या जीवाचा
डाव मी पसरू कसा
प्रयत्न खूप केले विसरण्याचे
त्याला मी विसरू शकत नाही
जशी पावसाला आहे
जमिनीची माया
तशी ओल्या डोळ्याला
ओल्या स्वप्नाची माया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा