रविवार, २६ जून, २०१६

साथ स्वप्नापर्यतची



तुझ्या गोड आठवणी
रंगवताना मी
सांग साथ देणार कशी
जी मागणार मी

वाट पाहत मी
रात काढली कशी
अंथरले जग सारे
आठवण घेऊ कशी

माझ तानुल पाऊल
तुझ्या या वाटेत चुकल
साथ नव्हती कोणाची
ओल अंकुर जागीच सुकल

स्वप्नातली मग साथ
नको देऊ तू दुरावा
कोरड्या मातीत
नव्याने ओलावा करावा

धूसर स्वप्नातली
ती नव्याची साथ
विसरणार कसा मी
माझ्या स्वप्नातील साथ



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...