रविवार, २६ जून, २०१६

स्वप्नातील सकाळ



कवेत कवटाळले तरी
पाकळ्या गळून गेल्या
तापत उन्हामध्ये
वेदना केव्हाच सुकून गेल्या

सांगायला सर्व जमतंय
अस काही राहत नाही
सतत या  भासामुळे
झोप का लागत लागत नाही

भास हा भासच असतो
तो काही खास नसतो
आनंदाचा एक जरी क्षण
तो एक खास असतो

माझ्या आठवणीचा भार
का हा पळतीचा खेळ
कशी सापडत नाही मला
ती स्वप्नातील सकाळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...