माझ्या या कविता
हि माझी कल्पना नाही
प्रत्येक शब्द आईसाठी
जी कधी हसलीच नाही
पाहिजे काय तिला
ती कधी सागत नाही
आपण हसलो तरी
ती कधी हसलीच नाही
संसारी वादळ वाटेवर
माय कधी फसलीच नाही
दु खःसोसता-सोसता ती
ती कधी हसलीच नाही
काटा रुतला पायात जरी
ती कधी रडलीच
नाही
सहन करण्यामुळे ती
ती कधी हसलीच नाही
या कामातून त्या कामात
माय रिकामी बसलीच नाही
लक्ष आहे का कोनाचे
ती कधी हसलीच नाही
ध्यान तीचे माझ्याकडे
तव्यावर हात कधी भाजलाच नाही
भाकरीच्या तुकड्यापायी
माय कधी
हसलीच नाही
जीव तिचा माझ्यासाठी
कुठे ध्यान दिलेच नाही
मी सतत हसावे म्हणून
ती कधी हसलीच नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा