शुक्रवार, १ जुलै, २०१६

किनाऱ्यावर बसलेलं

आडवाटेवर रुसलेलं
मऊ चिखलात बसलेलं
मायेकरता आसुसलेल
मन माझ ते किनाऱ्यावर बसलेलं

साथ कोणाची नसलेलं
डोळ्यात पाणी असलेल
कोणासाठी तरी रड्लेल
मन ते माझ  किनार्यावर बसलेलं

स्वप्नातच ते रंगलेलं
स्वप्न ते भंगलेल
दुखान माखलेल
मन माझ ते किनाऱ्यावर बसलेलं

कोणीतरी येईल
किती वेळा तरी भासलेल
ते पाहण्यासाठी आसुसलेल
मन माझ ते किनाऱ्यावर बसलेलं
होईल ते पाहू म्हणलेलं
कोणातरी भिलेल
एका त्या जागी बसलेल
मन माझ किनाऱ्यावर बसलेलं

नात त्या पाण्याशी नसलेलं
शिंपल्यात लपून बसलेलं
मोत्याचा जीव नसलेलं
मन माझ ते किनाऱ्यावर बसलेलं

ममता,मायेसाठी आसुसेल
सोबत कोणाची नसलेलं
एकटच राहत असलेल
मन माझ किनाऱ्यावर बसलेलं

साथ कोणची हि नसलेलं
जीवन याच हरवलेलं
थोडाच वेळ अस जगलेल
मन माझ ते एकट किनाऱ्यावर बसलेलं



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...