शुक्रवार, १ जुलै, २०१६

क्षणभर जगता येत

मरताना या ठिकाणी
काहीतरी पाहता येत
मरताना थोडफार या ठिकाणी
क्षणभर जगता येत

आठवणी सोबत घेऊन
कधी तरी रडता येत
मरताना थोडफार या ठिकाणी
क्षणभर जगता येत

दुखाच्या रात्रीसुद्या
सुखीस्वप्न पाहता येत
मरताना थोडफार या ठिकाणी
क्षणभर जगता येत

आपल्या दुख्यासोबत
दुसऱ्याचे सुख पाहता येत
मरताना थोडफार या ठिकाणी
क्षणभर जगता येत
पडणार्याला पाहून
काठीचा आधार होता येत
मरताना थोडफार या ठिकाणी
क्षणभर जगता येत

एकट्या या मार्गावर
साथ कोणाची मागता येत
मरताना थोडफार या ठिकाणी

क्षणभर जगता येत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...