शुक्रवार, १ जुलै, २०१६

स्वप्न मात्र एकटेच राहिले

तू आवडलीस म्हणून
मन मात्र खुलले
तुला पाहता –पाहता
स्वप्न मात्र एकटेच राहिले

तुला त्या जागी या डोळ्यांनी पहिले
लक्ष्य नव्हते त्याच्या कडे
स्वप्न मात्र एकटेच राहिले

तुझ्या या संगतीने
भान याचे हरवले
त्याला रंग आला पण
स्वप्न मात्र एकटेच राहिले

किती वेळा याने
तुला झोपेत पाहिले
या जागेवरून त्या जागेवर
स्वप्न मात्र एकटेच राहिले

तुझ्या संगतीसाठी
याने खूप काही सहन केले
तुला याचे काही वाटले नाही

स्वप्न मात्र एकटेच राहिले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...