शुक्रवार, १ जुलै, २०१६

पाहून लाजणे मला आवडायचे

तिचे लाजुन पाहणे,अन पाहून लाजणे मला आवडायचे
तिचे लाजून पाहणे , अन पाहून लाजणे मला आवडायचे

ती मला बघायची अन मी तिला बघायचो
हे दोघानाही आवडायचे
या आवडी-आवडी मधेच सवड मिळायची
ती दोघानाही कधी नाही कळायची
ती मला आवडायची अन मी तिला आवडायचो

माझे मन अगदी प्रसन्न व्हायचे
ती नाराज झाल्यावर मात्र सगळ्यावर पाणी फिरायचे

तिचे बघणे मला आवडायचे ,मला आवडायचे
 नजर नजरेतून ती मला बोलायची
तिला ठीक वाटणारी गोष्ट मला सांगायची
तीने ती कधीच नाही करायची

ती मला बघायची मी तिला बघायचो
कधी एके काळी वेड्या एका स्वप्नात जायचो
दिवसा मागून दिवस जात राहिली
प्रेमाची कहाणी  पडतच जायली

या प्रेमाच्या लव्हाळ्यामध्ये सवय  मिळतच राहिली
मी तिच्याकडे अन ती माझ्याकडे बघतच राहिली
आवड वाढतच राहिली ती मला आवडत राहिली

मी तिला अन ती मला आवडत राहिली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...