कोणी भेटेना म्हणून ,रडायचं नसत
जगता आलं नाही म्हणून ,मरायचं नसत...
रूप रंगवता आलं नाही म्हणून ,चित्र फाडायच नसत
मन मिसळून पुन्हा नाव नात जुळवायच असतं
कोणी थांबल नाही म्हणून ,रडायचं नसत
या न त्या जागी आपल्यासाठी कोणीतरी वाट पाहत असतं ...
विसरून जा म्हटल्यावर,विसरता येत नसत
आठवणीत जगन वाटत तेवढ सोप नसत
सुकलेल्या फुलाला पण पुन्हा कळी व्हाव वाटत
या आसेनेच बिचार रात्रभर झुरत असतं .....
वाटत पण खर प्रेम कोणालाच कळत नसत
कारण खर प्रेम ध्येय वेड असतं
कधी न बोलुन तर कधी डोळ्यांनी बोलून होत असतं
सागायचं तर खर प्रेम आठवणी आणि आठवणी जपायच असतं.....
ध्येय वेड्या काळरात्री गोड स्वप्न पाहायच असतं
थोडस मरायला,थोडस झुरायला खर प्रेम म्हणायचं असतं
प्रेमाला प्रेम म्हणत प्रेम करायच असतं
भविष्याची गोड स्वप्न पाहत ,रंगवत ,आनंदान जगायचं
असतं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा