शुक्रवार, १ जुलै, २०१६

वेड्यान रात्रभर जागावं


सागरालाहि वाटत
किनाऱ्याला भेटाव
त्याच्या कुशीत आटाव
आपल्याही कुणीतरी नवीन भेटाव

आठवणीच्या ओघात
आपल्यालाही मागाव
हद्र्यात जागा देऊन
क्षणभर तरी ठेवाव

मनातल्या भावना घेऊन
किती वेळा रडावं
पाणीदार या डोळ्यांनी
किती वेळा आटाव

जगताना कुणी यातना
आपल्याही ऐकायव
मनामध्ये त्याच्या एकदातरी
क्षणभर रहाव

ओल्या मातीत ह्या
किती वेळा रुताव
ओळखीचे दुख पण
किती वेळा झाकाव

ताऱ्यानाही वाटलं
एकदातरी तुटाव
कळीला जाऊन भेटाव
या करिता वेड्यान रात्रभर जागावं


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...