आई उच्चारण्यासाठी
लागलेली शक्ती
जिवंत असलेल्या एका
देवाचीच भक्ती
एका पाखराची ती
न रुंदावलेली काया
झाडाविना पसरली
गर्द तीची छाया
आई एक रुईचा धागा
वातीला उजेड दावणारी
समईची जागा
आई म्हणजे न सुटलेलं
स्वर्गीय कोड
आई म्हणजे नवे
अंकुरलेल मोड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा