तिच्यावर प्रेम करणे मला कधीच जमलेच नाही
पण तिच्या आठवणीशिवाय मनही कधी रमलेच नाही
ती नेहमी माझ्यावर हक्क गाजवायची ,
पण तिच्यावर हक्क
गाजवणे मला
कधीच जमलेच नाही
कारण समोरचा जो पर्यंत पूर्ण आपला होत नाही
तो पर्यंत त्याला आपले करणे मला कधी जमलेच नाही
ती माझ्यावर भरपूर प्रेम करायची
पण तिचे प्रेम माझ्या मनाने कधीच जाणले नाही
कारण कोणाच्या भावना
ओळखल्याशिवाय प्रेम समजत नाही
तीच हे भावनावेडे प्रेम मला कधी समजलेच नाही
तिला माझे म्हणणे कधी,पटलेच नाही
आणि म्हणून .....
तिच्यावर प्रेम करणे
मला कधी जमलेच नाही ..............
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा