सोमवार, ६ जून, २०१६

उठा उठा चिऊताई

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही !

सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही !

लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे !

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या !

बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...