सोमवार, ६ जून, २०१६


आई ,तुझे किती । प्रेमळ बोलणे ।
प्रेमळ हासणे । धैर्य  देते ॥

प्रेमळ हा स्पर्श । प्रेमळ उपदेश ।
कार्यही सफल । होते त्याने ॥

प्रेमळ हे हात । प्रेमळ हा घास ।
प्रेमळ मनाने । खाऊ घाली ॥

प्रेमळ आईचे । प्रेमळ लेकरु ।
आईची थोरवी । जाणून आहे ॥

इतुके प्रेमळ । घर हे आपुले ।
आई , तुझ्या ऋणी । राहो सदा ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...