कवी .कुसुमाग्रज
.........
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं..
पुरे झाले चंद्र-सुर्य , पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छातीकाढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इन्द्रधनु बांधील काय?
उन्हाळ्यात्ल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत
जास्तित-जास्त १२ महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहिल काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वीवेळ
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुध्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामधे अडकुनकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं...
माझ्या या कविता हि माझी कल्पना नाही... प्रत्येक शब्द तिच्यासाठी जी माझी झालीच नाही...!!!
शनिवार, ४ जून, २०१६
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
वैशिष्ट्यीकृत पोस्ट
पोशिंदा
पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...
-
पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...
-
आई तुझ्या कुशीत ,पुन्हा यावेसे वाटते निर्दयी या जगापासून ,दूर जावेसे वाटते ....१ कोणी न येथे कोणाचा सारीच नाती खोटी तुझ्याशीच फक्त आ...
-
आताच जाणवले मला असे नाही जपले शब्द मी तुझ्या मनातले … का नाही दिसले मला ते पाणी पाझरताना त्या डोळ्यातले … फक्त वेड्यागत पाहत ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा