रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

खरेच असावे कोणी तरी तू मला आवडतोस मनणारी

खरेच  असावे   कोणी तरी तू मला आवडतोस मनणारी खरेच असावे कोणी तरी तू मला आवडतोस मनणारी
जीवनाच्या प्रत्येक सु:खात आणि  दुःखात सतत माझ्या सोबत असनारी, संकट  आले तरीही साथ ना सोडनारी
खरेच असावे कोणी तरी तू मला आवडतोस मनणारी.मी दुःखात असेल तेव्हा मला समजावनारी
नेहमी माझ्या चेहर्या वर हसू आणण्याचा प्रयत्न  करणारी, खरेच असावे कोणी तरी तू मला आवडतोस मनणारी.
सतत मला परेशान करणारी, छोट्या - छोट्या गोष्टीं वर माझ्या वर चीडनारी व रुसनारी
, खरेच असावे कोणी तरी तू मला आवडतोस मनणारी.माझ्या मनातले सर्व ओळखुन घेनारी
मी न बोलता सर्व समजून घेनारी, माझे सर्व हट्ट  पुरवनारी, खरेच असावे कोणी तरी तू मला आवडतोस मनणारी.
मी  तिच्यावर  रागावल्या नंतर माझी समजूत  काढनारी, किती ही भांडण झाले तरीही सर्व  विसरून मला बोलनारी नी माझ्या डोळ्यातील  अश्रू पुसनारी, खरेच असावे कोणी तरी तू मला आवडतोस मनणारी.
प्रत्येक सेकंदला माझी आठवण काढनारी, मला बघितले की वेड्या सारखे खुश होनारी
माझ्या सु:खा साठी सतत देवा कडे साकडे घालनारी, छोट्या छोट्या गोष्टीं साठी माझी काळजी घेनारी,
 खरेच असावे कोणी तरी तू मला आवडतोस मनणारी.माझी काळजी घेनारी
, तिच्या प्रत्येक दुःखात नी सु:खात माझी साथ मागणारी,
 खरेच असावे कोणी तरी तू मला आवडतोस मनणारी.आयुष्यभर मला साथ देणारी, माझ्या पेक्षा   माझ्या घरचांची काळजी घेनारी, त्यांच्या तब्यती   बद्दल दररोज विचारणारी,
 खरेच असावे कोणी तरी तू मला आवडतोस मनणारी.माझ्या कडे छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट   करणारी
आयुष्य भर माझाच राहशील ना असे   विचारणारी, माझ्या आठवणीत डोळ्यातून   हळूच पाणी आणणारी,
 खरेच असावे कोणी तरी तू मला आवडतोस मनणारी.जीवनाच्या प्रत्येक अडचणीत साथ देणारी,
मला बदलून नाही मी जसा आहे तसे प्रेम करणारी, खरेच असावे कोणी तरी तू मला आवडतोस   मनणारी.                                                           -उद्धव मिसे        


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...