सोमवार, ११ जुलै, २०१६

प्रयत्न तर करून बघ.....?

प्रयत्न तर करून बघ.....?  


जीवनाच्या वाटेवर तुला खूप भेटले असतील
काही वाइट तर काही चांगले वाटले असतील .
चांगल्या मध्ये मी येतो का याचा विचार करून बघ
मला आपल्याशा बनवण्याचा एकदा प्रयत्न तर करून बघ.....

तुझ्या आयुष्यात तू दुसऱ्या कोणालातरी आपलासा मानत असचील
दुसरे कोणी हे नाही तोच तुला सर्वस्व वाटत असेल ....
एकदा माझ्याबद्दल विचार करून बघ
मला आपल्यासा करण्याचा एकदा प्रयत्न करून बघ .....

तू तुझ्यामध्ये सतत चांगले पणा शोधत असचील
त्याचा वाईटपणा लपवत असचील ....
एकदा माझ्यातील चांगलेपणा बघ
माझ्यातील चांगलेपणा शोधण्याचा एकदा प्रयत्न तर करून बघ .....

तुझ्या मनात सतत त्याच्या बद्दलविचार येत असेल
त्याच्या आठवणीत तू स्वतःला विसरून जात असचील .....
एकदा माझ्याबद्दल विचार करून बघ
माझ्या आठवणीत स्वतःला विसरून जाण्याचा एकदा प्रयत्न तर करून बघ ....

 जेव्हा तू मेकअप करतेस तेंव्हा आरश्यामध्ये त्याचाच चेहरा दिसत असेल
प्रत्येक गोष्टीत तोच दिसत असेल ,तो रोज तुझ्या स्वप्नात पण येत असेल ...
एकदा तुझ्या स्वप्नात येण्याचा चान्स तर देऊन बघ
त्या आरश्यामध्ये माझा चेहरा शोधण्याचा एकदा प्रयत्न तर करून  बघ....

तो नेहमी तुझ्या सोबत आहे असे तुला भासत असेल
तो नेहमी तुझ्या सोबत असावा असे तुला वाटत असेल ....
त्याच्या हातात हात घेऊन राहावे असे वाटत असेल ,एकदा मी तुझ्या सोबत आहे असे समजून तर बघ
माझ्या हातात हात देऊन मला बोलण्याचा एकदा प्रयत्न तर करून बघ ....

त्याच्या शिवाय मी राहू शकत नाही असे तुला वाटत असेल
तो माझा प्राण आहे ,माझ्या हृदयात मध्ये फक्त तोच आहे असे तु सांगत असचील ....
एकदा तुझा प्राण मी आहे असे समजून तर बघ
तुझ्या हृदयामध्ये मला थोडी जागा देण्याचा एकदा प्रयत्न तर करून बघ ....

तो तुझे चॉईस असेल,तुझे स्माईल असेल,तो तुझे पहिले प्रेम असेल
एकदा तुझ्या चेहर्याचे स्माईल मला बनवून तर बघ
माझ्या वर प्रेम करण्याचा Please .....एकदा प्रयत्न तर करून बघ ................. 



तुझा ....उद्धव 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...